Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

विराज जोशी याला कर्नाटक सरकारतर्फे ‘युवाप्रशस्ती पुरस्कार’ जाहीर

हा पुरस्कार मिळविणारा विराज हा सर्वात कमी वयातील मानकरी
पुणे : संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा नातू आणि पं.श्रीनिवास जोशी यांचा पुत्र व शिष्य गायक विराज जोशी याला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारा विराज सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला आहे.

किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांच्या नावाने कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना ‘युवाप्रशस्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येते. १८ ते २५ या वयोगटातील कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. नुकतेच वयाची १९ वर्षे पूर्ण करणाऱ्या विराजला यंदा हा प्रतिष्ठीत पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नाटक राज्यातील धारवाड येथे २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात विराजला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख रक्कम २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.  कुमार गंधर्व यांचे शिष्य ज्येष्ठ गायक पद्मश्री पं.मधुप मुदगल यांनादेखील यावेळी सन्मानित केले जाणार आहे.

विराज’ने आतापर्यंत भारतात विविध ठिकाणी १०० हून अधिक कार्यक्रमांमध्ये आपले गायन सादर केले आहे. यामध्ये प्रतिष्ठित असा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, मुंबई येथील काला घोडा महोत्सव, भारत भवन,भोपाल यांचा समावेश आहे. त्याने परदेशात २५ हून अधिक कार्यक्रम केले आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. तसेच मुंबई येथील षणन्मुखानंद सभा यांच्यातर्फे दिली जाणारी संगीत क्षेत्रातील अतिशय मानाची अशी डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी विद्यावृत्ती त्याला मिळाली आहे. सदर विद्यावृत्ती विराजला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली होती. सध्या विराज कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात बी ए लिबरल आर्ट्स’ च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading