पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस पदी रुत्विक धनवट यांची निवड
पुणे : माजी राज्यमंत्री व माजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत ,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर युवक काँग्रेसचा पद नियुक्ती कार्यक्रम पुणे कॉग्रेस भवन येथे पार पडला. याप्रसंगी रुत्विक धनवट यांची पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजीत दादा कदम, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मा. मितेंद्र सिंह, पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे युवक काँग्रेस मा. अध्यक्ष विकास लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष मा. शिवराज मोरे व पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री राहुल शिरसाट यांच्या उपस्थितीत पद नियुक्तीचा व पक्ष प्रवेशाचा समारंभ संपन्न झाला.आगामी महानगरपालिका निवडनुका लक्षात घेतां हा समारंभ महत्त्वाचा मानला जातोय.
