fbpx

पुण्यात ऐतिहासिक महाभारताचा २६ ऑगस्टला रंगभूमीवर थरार

महानाट्यातील कलावंत पुनीत इसार आणि  सिद्धांत इसार,  दिवा टेल्स, स्मिता हॉलीडेस यांची घोषणा
पुणे : ऐतिहासिक महाभारत हे एका पिढीने दूरदर्शनच्या मालिकेतून अनुभवले मात्र, आता महाभारताचा तोच थरार भव्य रंगमंचावर पुणे करांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या २६  ऑगस्ट रोजी गणेश क्रीडा कला मंच स्वारगेट , पुणे वर हा भव्यदिव्य महानाट्याचा प्रयोग होणार असून तब्बल ५० कलाकार व अन्य तांत्रिक सहकारी असा तामझाम असणार आहे. हे महाभारत काव्यात्मक संवादाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून पुढील एक पिढी देखील ते विसरणार नाही असे दुर्योधनचे पात्र साकारणारे जेष्ठ कलाकार तथा लेखक पुनीत इसार यांनी सांगितले. पुणे येथे रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. स्मिता हॉली डेसप्रस्तुत महाभारत दिवा टेल्स या महाभारत महानाट्याचे आयोजक आहेत.

याप्रसंगी बोलताना पुनीत इसार म्हणाले की, ३० वर्षांपूर्वी महाभारत मालिकेच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर करून राहिले आहे. मात्र, ते ४९ भाग बघणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे आजच्या पिढीला ३ तासांमध्ये महाभारत का घडले हे कळावे त्यादृष्टीने लिहिण्यास सुरुवात केली. यातील संवाद हे काव्यात्मक असल्याने महाभारत द इपिक टेल पूर्ण लिहिण्यास चार वर्षे लागली. हे महाभारत दुर्योधन आणि कर्णच्या दृष्टीने लिहिले आहे. “जो जिंकतो त्याचा इतिहास लिहिला जातो. मात्र, जो हारतो त्याचा देखील एक पक्ष असतो.” भीष्मपिताम्ह, द्रोणाचार्य, शकुनी मामा यांचाही पक्ष आहे. तसे पाहिले तर महाभारतावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. मात्र, तीन तासात महाभारत का घडले हे या महानाट्यातून उलगडले आहे. आजवर या महानाट्याचे १०० प्रयोग पूर्ण झालेले आहेत. दिल्ली, सुरत, लुधियाना, वृंदावन, मुंबई अशा विविध शहरानंतर आता पुणे    येथे २६ ऑगस्टला   ला भव्यदिव्य महाभारताचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: