पी. जोग विद्यालयाचा सावळा कारभार उघड;विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
प्राचार्याच्या खुर्ची वर दगड ठेवून, विद्यालयाला कुलूप ठोकून विद्यार्थी परिषदेने निषेध व्यक्त केला
पुणे:नुकताच सीबीएसई बोर्ड चा इयत्ता १० वी चा निकाल लागला. कोथरूड मधील पी. जोग विद्यालयाच्या सावळ्या कारभाराची उघड या निकालानंतर लागलेली दिसून आली. इयत्ता १० वे शिक्षण घेणाऱ्या तब्बल ६०% विद्यार्थ्यांचे भविष्य या विद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे टांगणीला लागलेले दिसून येत आहे.
या घटनेची माहिती कानावर पडता, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगरातील कार्यकर्ते या ठिकाणी गेले असता, त्यांनी प्रशासनाची बोलण्याचा व प्रश्न मार्गी लावण्यासाठी तोडगा काढण्यासाठी चा प्रयत्न केला. मात्र, विद्यालय प्रशासनाकडून काहीही सकारात्मक उत्तरे मिळाली नाहीत. या सर्व विषयासंबंधीतची विद्यालयातील अधिकाऱ्यांनी देखील तिथून पळ काढला व समोर येण्यास कारणे देत मनाई केली. जी मुले पास झाली त्यांच्या निकालामध्ये देखील काही स्पष्टता नसल्याचे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे मत आहे.
या सर्व गोंधळाच्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालकांच्या बाजूने विद्यालय प्रशासनाला प्रश्न विचारत होते तेव्हा समोरून कसल्याही प्रकारची सकारात्मक बाजू मांडण्यात आली नाही. तसेच, या सर्व प्रकरणात विद्यालयाची जी बाजू आहे अथवा विद्यार्थ्यांचे कसल्याही प्रकारचे नुकसान विद्यालय होऊ देणार नाही असे लेखी पत्रक जेव्हा मागण्यात आले, तेव्हा आम्ही लेखी पत्रक देण्यासाठी बांधील नाही, असे उत्तर विद्यालयाचे चेअरमन अमोल जोग यांनी दिले.
आपल्या कडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची विद्यालय प्रशासनाला काही काळजी आहे की नाही? असा प्रश्न समोर उभा आहे. या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी विद्यालय प्रशासनाला लागेल ती जबाबदारी उचलावीच लागेल व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी विद्यालय प्रशासनाला केले. घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या व गैर जबाबदारी ने वागून विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या पी जोग विद्यालयाच्या प्राचार्याच्या खुर्ची वर दगड ठेवून व विद्यालयाच्या गेट ला कुलूप लावून विद्यार्थी परिषद,व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी, विद्यालयातील विद्यार्थी, पालक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
