fbpx

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि कर्नाळा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा या विषयावर महाराष्ट्र विद्यालय येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल दी. कश्यप, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील, गजानन कुलकर्णी, अॅड. घनःश्याम खलाटे यांनी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

भारताचे भावी नागरिक म्हणून कायदेशीर हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असणे तेवढेच महत्वाचे आहे असे सांगून श्रीमती कश्यप यांनी बालकांवरील अत्याचार, बालकांचे मुलभूत हक्क आणि शिक्षणाचा अधिकार आदी विषयांवर शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: