fbpx

सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

पुणे : राजकारणातील अनेक रथीमहारथींवरील कारवाईनंतर आता ईडीने काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींगबाबत चौकशी करण्यासाठी सोनिया गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे असून गांधी आज इडीसमोर हजर राहणार आहेत. त्या निषेधार्थे आज काँग्रेसने राज्यभरात आंदोलन केले हे आंदोलन पुण्यात सुद्धा केले गेले.

हे आंदोलन पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष रमेश बागवे, आमदार मोहन जोशी, संगीता तिवारी, गोपाळदादा तिवारी,  अभय छाजेड, काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षाच्या मंत्र्यांना कुठल्या कुठल्या घोटाळ्यामध्ये मध्ये अडकून आपली सत्ता देशात राबवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे भाजप सरकार जे करत आहे हे लोकशाहीला घातक आहे .केंद्रात भाजपाची सत्ता येऊन सात वर्ष झाली आहेत. या काळात सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यावरून नागरिकांचे मन विचलित करण्यासाठी देशभरातील विरोधकांच्या ईडी, सीबीआय मार्फत चौकशी लावली जात आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस बजावून हजर होण्यास लावले आहे. या गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. यातून केवळ दबाव आणून सर्व सामान्य नागरिकांमध्ये काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम हे सरकार करीत आहे. भाजपाला एवढंच वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावे, आम्ही तिथे आमची बाजू मांडू. असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: