Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भाजपच्या चार महिला आमदारांना गंडा घालणारा भामटा अटकेत

पुणे : राज्यातील भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आरोपी मुकेश राठोडला अटक केली आहे. यासंदर्भात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी की, आई आजारी असल्याचे कारण सांगत मुकेश राठोड नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे भाजपच्याच आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चार आमदारांना मुकेश राठोडने गंडा घातला. मुकेश राठोडला पुणे पोलिसांनी आज अटक केली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading