Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

कोथरुडमधील खचलेले रस्ते तातडीने दुरुस्त करा -चंद्रकांत पाटील यांचे आयुक्तांना पत्र

पुणे :गेल्या आठवड्याभरात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे; तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. त्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले असून, तातडीने कोथरूड मधील रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोथरुड मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे, कर्वेरोड, आशिष गार्डन चौक, गुजराथ कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक- कॅनॉल रोड), पौड फाटा, सदानंद हॉटेलसमोरील बाजू, चांदनी चौक आयटी पार्क समोर, कोथरुड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता, पौड रोड आनंदनगरसमोरील बाजू, यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत. याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्या लागतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत.

त्यामुळे सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रस्त्यांवर एखादा मोठा अपघात होऊन, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी संभाव्य शक्यताची भीषणता लक्षात घेऊन सदर भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading