fbpx

औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजना

नवी दिल्ली : “भारतातील औषधी वनस्पती: त्यांची मागणी आणि पुरवठ्याचे मूल्यांकन, वेद आणि गोराया( 2017)’ या शीर्षकाचे एक अध्ययन, भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेने (ICFRE) राष्ट्रीय वैद्यकीय वनस्पती मंडळाच्या (NMPB), पाठबळावर केले होते.या अध्ययनानुसार, 2014-15 मध्ये भारतात वनौषधी/औषधी वनस्पतींची वार्षिक मागणी 5,12,000 मेट्रिक टन आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

या अध्ययनानुसार, सध्या 1178 औषधी वनस्पतींच्या प्रजाती ह्या व्यवसायात वापरल्या जात असून त्यापैकी 242 प्रकारच्या वनस्पतींची मागणी तर खूप मोठी म्हणजे वार्षिक 100 मेट्रिक टन इतकी आहे. या 242 वनस्पतींचे अधिक सखोल विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की यातील 173 प्रकारच्या वनस्पती (72%) वनांमधून गोळा केल्या जातात.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने देशभरात, औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक वर्ष 2015-16 ते 2020-21 या काळात, राष्ट्रीय आयुष मिशन ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना राबवली.राष्ट्रीय आयुष मिशनच्या औषधी वनस्पती या घटकाअंतर्गत, खालील प्रकारचे सहाय्य केले जाते:

  1. शेतकऱ्यांच्या भूमीवर अधिक मागणी असलेल्या औषधी वनस्पतींची लागवड करण्याला प्राधान्य.
  2. उत्तम दर्जाच्या वनस्पती लागवडीसाठी आवश्यक तो माल पुरवठा करण्यासाठी वृक्षवाटीकांची स्थापना

3.पुढे जाण्यासाठीची शृंखला उपलब्ध करत, पिकांनंतरही कापलेल्या पिकांची काळजी घेण्यासाठी मदत.

  1. प्राथमिक प्रक्रिया, विपणनासाठीच्या पायाभूत सुविधा इत्यादि

आयुष मंत्रालयाने 2015-16 ते 2020-21 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत, देशभरात 56,305 हेक्टर क्षेत्र व्यापणाऱ्या औषधी वनस्पतींच्या लागवडीला मदत केली आहे.

सध्या, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ,”औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन” या विषयावर केंद्रीय पातळीवरील योजना राबवत आहे. याअंतर्गत, खालील कामे केली जातात:

i.झाले आहेत तिथेच त्यांचे संवर्धन/ रोपट्यांचे/वृक्षांचे दुसऱ्या जागी संवर्धन

ii.संयुक्त वन व्यवस्थापन समित्या/ पंचायत/ वन पंचायती/ जैवविविधता व्यवस्थापयन समिती/ बचत गट (SHGs).

iii.IEC उपक्रम जसे की प्रशिक्षण/कार्यशाळा/सेमिनार/परिषद इ.

iv.संशोधन आणि विकास.

आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: