समाविष्ट गावातील वाहतूकीच्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन
पुणे : जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने समाविष्ट झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांना आणि विद्यार्थी यांना वाहतूकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यांची मोठी गैरसोय होत आहे कोळेवाडी, आंबेगाव पठार भागातील चिंतामणी ज्ञानपीठ, जिजामाता चौक, सूर्यमित्र मंडळ, निलगिरी हि भागांमध्ये अद्यापही बससेवा सुरू केली नाही पी.एम. पी.एल.प्रशासनाला पाठपुरावा करून देखील बससेवा सुरू केलेली नाही त्याबाबत पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले यावेळी मा. सुधीर जाधव साहेब,मा. भूषण रानभरे (अध्यक्ष पुणे जिल्हा एन.एस. यू. आय.विद्यार्थी संघटना), निलेश सांगळे ( सचिव, पुणे जिल्हा युवक काँग्रेस ), युवराज तांबे, राहुल कोळी,मा . शेवतेजी,मा. विक्रमजी गोडसे (अध्यक्ष,युवा संभाजीराजे प्रतिष्ठान भारती विद्यापीठ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते