Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Rain Alart : राज्यात आज यलो तर गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट, पुण्यात मुसळधार

पुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही (Rain Update) दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. गेल्या 24 तासात कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फोंडा 186, माथेरान 116, दोंडामार्ग ९४, दाबोलीम 87, तर कर्जत 80 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी 128, लोणावळा 116, महाबळेश्वर 107, आजरा 98, राधानगरी 85, गगनबावडा 66, शाहुवाडी 52, तर वेल्हेत 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील शिरगाव 168, कोयना 162, दावडी 138, अम्बोणे 112 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या द्रोणीय स्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हायत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक परिसरातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पासाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.

गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading