fbpx

विधानपरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता असावा – नाना पटोले

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींचा अहवाल काँग्रेसच्या विधानपरिषदेतील क्रॉस वोटिंग संदर्भातील माहितीचा अहवाल काँग्रेसच्या हायकमांडला पाठवणार असल्याचं काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
त्याचबरोबर विधानसभेत आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादीचा विरोधीपक्षनेता आहे तर विधानपरिषदेत आमचा विरोधीपक्षनेता असावा अशी आमची मागणी आहे असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे विधापरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याशी संपर्क केला जात असल्याचं पटोले यांनी सांगितलं आहे. देशात सदृढ लोकशाही पाहिजे असेल तर सत्तापक्षांनी विरोधकांनी शत्रू समजलं नाही पाहिजे असं मत पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, देशात विरोधीपक्षाला शत्रू समजलं जातं असं सरन्यायाधीस एन.व्ही. रमना यांनी सांगितलं. देशात भाजपने सर्व विरोधी पक्षांना शत्रू समजत आलं आहे. त्यामुळे रमना यांनी हे वक्तव्य केलं आहे. अशा वागण्यामुळे देशात सदृढ लोकशाही राहू शकत नाही. लोकशाही वाचवणे हा सर्वांपुढे महत्त्वाचा प्रश्न म्हणून उभा आहे असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
शिंदे भाजप सरकार राज्यात स्थापन झाल्यावर राष्ट्रवादीचे अजित पवार यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधानपरिषदेत आमचा विरोधीपक्षनेता असावा अशी मागणी आम्ही राष्ट्रवादीकडे करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: