fbpx

Early Bird Preschool : माऊली… माऊली…च्या गजरात आषाढी वारी साजरी 

पुणे : चिमुकल्या हातातील टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा अन् माऊली… माऊली…चा गजरात अर्ली बर्ड प्रीस्कूलमध्ये आषाढी वारी साजरी करण्यात आली.  छोट्या छोट्या  वारकऱ्यांनी खांद्यावर पालखी घेवून पांडूरंग हरी …., ज्ञानेश्वर माऊली.., विठ्ठल विठ्ठल विठ्ठला.. अशी भक्ती गीत व भजन गात वातावरण भक्तीमय केले. यावेळी विद्यार्थी पारंपारीक वारकरी वेशभूषेत वारीत सहभागी झाले.

धनकवडी, मोहन नगर परिसरातील अर्ली बर्ड प्रीस्कूलमध्ये आषाढी वारीचे औचित्य साधून पालखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या प्रियांका बगाडे, सह शिक्षिका राणी थोरात, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी अध्यक्ष राजन बगाडे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: