fbpx

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन, कीर्तन महोत्सव

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड शास्त्री यांसह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार सहभागी होणार आहेत. दिनांक १७ जुलै ते १३ आॅगस्ट दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ६ नंतर हे कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत.

चातुर्मास प्रवचनांतर्गत ‘संपूर्ण परिपाठ’ याविषयावर दिनांक १७ ते ३१ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत प्रवचने होणार आहेत. यामध्ये ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर व ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर या निरुपण करणार आहेत.

दिनांक १ ते ६ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. त्यामध्ये सोमवारपासून (दि. १ आॅगस्ट) अनुक्रमे कर्वेनगर येथील ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, संगमनेर येथील ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज, ह.भ.प.रामराव ढोक महाराज, आंबेगाव येथील ह.भ.प.बाजीराव बांगर महाराज, नाशिक येथील ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर आणि ह.भ.प. संजयनाना धोंगडे यांचा समावेश आहे.

दिनांक ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’ याविषयावर निरुपण होणार आहे. यामध्ये गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड शास्त्री हे निरुपण करणार असून श्री गणेशाशी निगडीत विविध कथा, अथर्वशीर्षाचे महत्व व महात्म्य याविषयी ते बोलणार आहेत. सर्व कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: