fbpx

भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. रेवती पैठणकर तर उपाध्यक्षपदी दीपा दाढे यांची निवड

बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्नपुणे : भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. रेवती पैठणकर तर उपाध्यक्षपदी दीपा दाढे यांची निवड झाली आहे. प्रभात रस्त्यावरील बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

डॉ. रेवती पैठणकर या व्यवसायाने सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांना या क्षेत्रातील ३७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बँकिंग आणि फायनान्स या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. उपाध्यक्षा दीपा दाढे यांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारीपदावर काम केल्याचा सुमारे २४ वर्षांचा अनुभव आहे. बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळात सुनंदा करमरकर, विद्या रानडे, जयश्री काळे, अॅड. जयश्री कुरुंदवाडकर, जयश्री लष्करे, सुनीता रानडे, डॉ नेत्रा आपटे, मीना गायकवाड, अॅड. सुप्रिया जोशी, स्वाती काळे, जयश्री रावळ यांचा समावेश आहे.

भगिनी निवेदिता सहकारी बँक ही महिलांनी सर्वांसाठी चालविलेली बँक आहे. बँकेचे पुढील वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल. बँकेस महाराष्ट्र शासनाचे सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेची रु. १५०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल सुरु आहे. बँकेने सतत २३ वर्षे १५% लाभांश दिला आहे. मागील १७ वर्ष बँकेनचा नेट एनपीए  0%  (शून्य टक्के) आहे. व्यवसायाच्या सर्व निकषांवर संतुलित वाढ आणि चोख व्यवस्थापन यामुळे सातत्याने बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: