fbpx

येरवडा येथील तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न

पुणे : येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पीटल व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबीया यांच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संचेती हॉस्पीटलचे डॉ. श्रेयस रेवणकर, डॉ. विशाल टापरे, डॉ. अनहिता थॉमस, डॉ. सिमरन काबरा, विजय कासार यांच्यामार्फत आणि दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदूरकर यांच्या पर्यवेक्षणाखाली शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली.

दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयालयातील प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी तुरुंगाधिकारी व प्रशिक्षणार्थी कारागृह शिपाई, कारागृह उप महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला.

या वैद्यकीय शिबीरासाठी प्रशासन अधिकारी गेडेवाड यांच्यासह तुरुंग अधिकारी आणि सर्व कवायत निर्देशक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: