Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला – एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज  शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठकी घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती, ब्रेकच लागत नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मात्र, ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिदेंनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीट केलं असून ते म्हणाले की, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार, असं ट्विट एकनाथ शिंदेंनी करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

विधानपरिषदेत दोन्ही जागा जिंकून येतील असं म्हणत होते, आले देखील निवडून. पण १२ मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचं कटकारस्थान कधीपासून सुरू होतं, काल ते विधानसभेत गुपीत खुललं. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा…गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला…रिक्षाचा ब्रेक फेल…त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर…आता चालवा सरकार, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading