Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आनंद दवेच्या सुरक्षेची काळजी पुणे पोलिसांनी घ्यावी संजय राऊत यांचे ट्विट

पुणे: ब्राम्हण महासंघाचे नेते व कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांची काळजी घ्यावी. असे आवाहन ट्विटर द्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांचे समर्थन करणाऱ्या उदयपूर येथील कन्हय्यालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे देशासह राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यानंतर आता ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून, केंद्राच्या या सूचनेनंतर पोलिसांनी दवे यांचे कार्यालय, घर आणि हिंदू महासंघ कार्यालयास सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांची काळजी घ्यावी. असे ट्वीट केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading