Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पाणीसाठा पोहोचला ३ टीएमसीवर

पुणे : यंदा पाऊस लांबल्याने पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मागील बारा तासात पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात एकूण 2.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
चारही धरणातील पाणीसाठा 2.51 टीएमसी इतका खाली आला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. याशिवाय सोमवारी रात्री देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या चारही धरणात एकूण 2.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार खडकवासला 19 मिमी , वरसगाव 53 मिमी, टेमघर 66 मिमी तर पानशेत 50 मिमी इतक्या पावसाची नोंद मागील 24 तासात झाली आहे. याशिवाय या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये

टेमघर ५.०९.३४

वरसगाव २.०५ ९.१५

पानशेत २.१५२०.४५

खडकवासला १.५९ ३०.१४

एकूण ३.७५.५६

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading