विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचा विजय
मुंबई ; शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे भाजप च्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले. यानंतर आज त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. प्रथम आवाजी आणि त्यानंतर शिरगणती पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतला. या निवडणुकीत भाजपच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यांना 164 मते मिळाली.
भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी दिला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमति दिली. तर महाविकास आघाडी कडून अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या चेतन तुपे यांनी दिला, त्याला कॉँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले.
या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी आणि एम आय एम चे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
