Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे : शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. यामुळं शिवसैनिकांसह आढळराव समर्थकांना हा मोठा धक्का मानला जातोय.
मागील अनेक दिवसांपासून शिवाजी आढळराव पाटील हे महाविकास आघाडी सरकार होते. त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीररीत्या बोलून देखील दाखवली होती. अगदी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील राष्ट्रवादी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका देखील त्यांनी केली होती. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उपनेते पद देण्यात आलं होतं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading