Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

जागतिक पातळीवरील  ट्रूग्लोबल  सॉफ्टवेअर कंपनीचे पुणे शहरात नवीन कार्यालयाचे उदघाटन 

पुणे : अमेरिकेतील डब्लिन सीए येथे मुख्यालय आणि इतर अनेक ठिकाणी व भारतात बंगलोर येथे कार्यालये असलेली  ट्रूग्लोबल या अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनीने आता पुणे शहरात बाणेर परिसरात आपल्या कार्याचा विस्तार करत नवीन कार्यालयाचे उदघाटन प्रसिद्ध क्रिकेटर रॉबिन उथप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रूग्लोबल कंपनीचे सीईओ इब्राहिम शरीफ, व्हीपी ग्लोबल डिलेव्हरीचे ज़ैद महवी आणि कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते

ट्रूग्लोबल जगभरातील अनेक फॉर्च्युन ५००  कंपन्यांसह विविध ग्राहकांसह काम करणारी शीर्ष जागतिक आयटी सेवा कंपनी आता पुण्यात आली आहे . उद्योग क्षेत्रातील आपले समृद्ध ज्ञान आणि विचार नेतृत्वाने सक्षम असलेल्या एंड-टू-एंड सोल्यूशन आर्किटेक्चरच्या अंमलबजावणीच्या विस्तृत अनुभवांच्या  आधारे आपल्या ग्राहकांसाठी गुंतागुंतीची वसायिक आव्हाने सोडवण्यासाठी ट्रूग्लोबल प्रसिद्ध आहे.

ट्रूग्लोबलने जगातील फेसबुक, ट्विटर, एनविडिया, लिंक्डइन, पेनुंब्रा, सिमँटेक, जीनेनटेक आणि अन्य अनेक सर्वोत्तम कंपन्यांसोबत काम केले आहे. ट्रूग्लोबलचे मुख्य कार्यालय डब्लिन सीएमध्ये असून डलास टीएक्स व वॉशिंग्टन डीसी येथे कार्यालये तर बंगलोरमध्ये ग्लोबल ऑपरेशन्स सेंटर आहेत. ट्रूग्लोबल आता मध्य भारतातील आयटी हब असलेल्या पुणे येथे नवीन अत्याधुनिक कार्यालय घेऊन येत आहे. त्यामुळे तिच्या जागतिक पातळीवरील विस्तारास मदत होईल.

ट्रूग्लोबलचे संस्थापक आणि सीईओ इब्राहिम शरीफ या उद्घाटनानिमित्त आनंद व्यक्त करताना म्हणाले की पुणे येथे येणाऱ्या नवीन कार्यालयामुळे आम्हाला आमच्या कार्याचा विस्तार करण्यात मदत होईल. तसेच अधिक चांगल्या आणि कार्यक्षम वितरणासाठी आमच्या ग्राहकांच्या उद्दिष्टे आणि ध्येयांशी जुळवून घेण्यास आम्हाला मदत होईल. पुण्यातील आमची टीम एआय/एमल, आरपीए व इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी या क्षेत्रातील अत्याधुनिक आणि ताज्या अत्याधुनिक ऍप्लिकेशन्सचा समावेश असलेल्या अत्याधुनिक तांत्रिक उपायांवर काम करेल . तसेच सुरक्षा उपाय मजबूत करून धोके कमी करतील आणि क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनला चालना देतील. एक उदाहरण द्यायचे तर आम्ही इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर केलेल्या इंट्यूटिव्ह रिहॅबिलिटेशन टूलच्या माध्यमातून ड्रायव्हरविरहित कारच्या क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या एका ऑटोनॉमस कारच्या प्रकल्पावर काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुण्यात येणे ही आमच्यासाठी स्वाभाविक निवड होती. पुणे हे जगप्रसिद्ध औद्योगिक आणि आयटी हब असल्यामुळे, उत्तम पायाभूत सुविधा आणि गतिशील संस्कृती आहे. तसेच या शहरात भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपर्यंत पोचता येते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading