Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे साहेब माझ्या कानात सांगितले असते तरी मुख्यमंत्री केले असते – अजित पवार

मुंबई :  राज्यात घडलेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्या आली. यावेळी अध्यक्षांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चौफेर टोलेबाजी करत, शिंदे साहेब माझ्या कानात सांगितले असते तरी मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून तुम्हाला मुख्यमंत्री केले असते, कशाला ही उठाठेव केली असा सवाल उपस्थित करतानाच मुळ भाजप नेत्यांना बाजूला सारून पहिल्या रांगेत बसलेले सर्व मुळचे आमचेच असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळणे अवघड असल्याचा टोला लगावला.

पुढे बोलताना अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचे व सासरे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व कुटुंबियांचे अभिनंदन केले.  राहुल नार्वेकर यांचा शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप हा प्रवास उलगडत आदित्य ठाकरे यांचे तुम्ही जवळचे सहकारी, कायदा सल्लागार  होता याचीही आठवण त्यांना अजित पवार यांनी  करून दिली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading