Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीची नोटीस

मुंबई : तीन दिवसांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. 5 जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. 

संजय पांडे ज्यावेळी DG होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करु शकते, असे म्हटले जातेय.

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

– आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण
– 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी

– 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना

– 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे

– 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.

– 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला

– 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.

– 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

– 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते

– 2001 मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.

– 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.

– कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.

– 2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.

– अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.

– 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

– 30 जून 2022 रोजी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading