अभिनेत्रीवर कडून महिला पोलिसाला मारहाण
पुणे : वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका नवोदित अभिनेत्री कडून महिला पोलिसाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकाशी संलग्न असलेल्या परविन शेख यांनी शुक्रवारी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, ‘त्या’ अभिनेत्रीला अटक करण्यात आलेली आहे.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही २८ वर्षीय नवोदित अभिनेत्री अंधेरी, मुंबई येथे राहणारी असून मूळ कर्नाटकची रहिवासी आहे. तिने काही वेब सिरीजमध्ये भूमिका केल्या होत्या. काही कामानिमित्त ती पुण्यात आली असता तिने वडगाव शेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये ऑनलाइन पद्धतीने रूम बुक केली होती. मात्र तिला या हॉटेलमधील सुविधा आवडत नसल्याने तिने पैसे परत मागितले. यावेळी तिचे हॉटेलच्या कर्मचार्यांशी भांडणही झाले. दरम्यान, हॉटेल मालकाने पोलिसांना याबाबद माहिती देण्यात आली. यावेळी दामिनी पथकाच्या महिला पोलीस घटनास्थळी पोहोचल्या. त्या प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने पोलीस महिला परवीन शेख हिला मारहाण केली आणि तिच्या हातावर चावा घेतला.
हा संपूर्ण प्रकार शुक्रवारी (1 जुलै) घडला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक मंजुषा मुळूक करत आहेत.
