एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल रिक्षाचालकांनी केला जल्लोष
पुणे : आज पुणे मधील रिक्षाचालकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री पदी विराजमान झाले म्हणून अभिनंदन केले.
पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक असणारे मुख्यमंत्री* रिक्षाचालकांचे प्रश्न समजावून घेतील व बेकायदा बाईक टॅक्सी , CNG चे वाढलेले दर , फायनान्स कंपन्यांची गुंडागर्दी ,रिक्षाचालकांचे कल्याणकारी असे विषय गांभीर्यपूर्वक सोडवतील अशी आशा रिक्षाचालकांनी व्यक्त केली. सदर प्रसंगी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर, राजाभाऊ भिलारे , आशिष ओपळकर, अल्ताफ शेख, शरद पवार, रविंद्र ठाकूर व इतर अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.
