एण्ड टीव्हीवरील मालिकांमधील तुम्हाला हसवून-हसवून लोटपोट करणारे विनोदी संवाद!
आंतरराष्ट्रीय विनोद दिन हा आपल्याला हसवणा-या आणि आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक हास्य आणणा-या लोकांना प्रशंसित करण्यासाठी साजरा केला जातो. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) व विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) आणि मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी) व त्याची पत्नी राजेश (कामना पाठक) या भारतीय टेलिव्हिजनवरील दोन सर्वात लोकप्रिय जोड्यांनी त्यांची विनोदी शैली, पती-पत्नीमधील तूतू-मैंमैं, क्लेव्हर वन-लाइनर्स आणि उत्तम विनोदी शैलीसह प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच त्यांच्यामधील विनोदी गमतीजमती सोशल मीडिया व्यासपीठांवर व्हायरल देखील आहेत. आम्ही काही सर्वात विनोदी संवादांबाबत सांगत आहोत, जे तुम्हाला हसवून-हसवून लोटपोट करतील. हप्पू दरोगा सिंग आणि त्याची दबंग दुल्हनिया पत्नी राजेश त्यांच्यामधील धमाल मिया-बिवी गमतीजमती व विनोदी संवादांसाठी ओळखले जातात. एका विनोदी एपिसोडमध्ये राजेश म्हणते, ”जाओ मैं तुमसे बात नही करूंगी.” हप्पू त्वरित प्रतिक्रिया देत म्हणतो, ”वाह! मैंने क्या किया है बता दो, आगे ऐसा ही करूंगा.” (गालातल्या गालात हसतात). राजेशला हे सहन झाले नाही आणि तिने योग्य ती प्रतिक्रिया दिली! एकेदिवशी हप्पूने तिला विचारले, ”तुम तयार होने में देर करती हो, मुझे तो दो मिनट ही लगे है.” राजेश रागाने प्रत्युत्तर देते की, ”खिचडी और शाही पनीर बनने में अंतर होता है.”
अंगूरी भाभीची विलक्षणपणे संवाद बोलण्याची पद्धत मालिकेच्या अनेक निस्सीम फॉलोअर्ससाठी हास्याची पर्वणी आहे आणि तिचा नखरेबाज शेजारी विभुती नारायण मिश्रा तिचे संवाद सुधारण्याची एकही संधी चुकवत नाही. अंगूरी भाभी रोपांना पाणी घालत आहे आणि उत्साहात म्हणते, ”आज हमे लड्डू के भैय्याने नया मोबाइल खरीद के दिया है.” विभुती प्रत्युत्तर देतो, ”अरे वाह! कोनसे कंपनी का मोबाइल दिया है भाभीजी?” अंगूरी म्हणते, ”लावारिस”, ज्याला विभुती त्वरित सुधारत म्हणतो, ”भाभीजीवो लावारिस नही, लावा आयरिस है.” अंगूरी भाभी तिच्या प्रसिद्ध संवादासह म्हणते, ”सही पकडे है!” विभुती आणि अंगूरी भाभीच्या न संपणा-या विनोदी गप्पागोष्टी अधिक हास्यजनक आहेत. विभुती विचारतो, ”भाभीजी इतनी उदास क्यू है आप? व्हाय? व्हाय आर यू क्राइंग फॉर मी? किसीने कुछ कहा आपको?” अंगूरी भाभी तरीदेखील रडत राहते. विभुती विचारतो, ”बताए ना इतनी रो क्यू रही है आप. आखों से इन मोतीयों को टपकने से रोके. ये खजाना बडे मुश्किल से मिलता है.” अंगूरी खिन्नपणे प्रतिक्रिया देते, ”वो ना हम बडे हॉट हो गये है.” विभुती त्याच्या नखरेबाज अंदाजामध्ये म्हणतो, ”भाभीजी ये भी कहने की बात है, जितनी पुरानी हो रही है, उतनी हॉट हो रही है आप. आप पुरानी शराब की तरह है, जितनी पुरानी हो रही है, उतना मजा आ रहा है.” निरागसपणे भाभीजी विचारते, ”हां क्या बोलें?” विभुती: ”मेरा मतलब भाभीजी वो हॉट नई हर्ट होता है.” शेवटी भाभीजी तिच्या देशी स्टाइलमध्ये म्हणते, ”जी सही पकडे है.”
