धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री घेतली फडणवीस यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कातंत्राचे प्रयोग सुरूच आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन घडामोडीनंतर नवी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मध्यरात्री ही बैठक झाल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी भाजपामध्येच सक्रीय होते. आता राष्ट्रवादीमध्ये ते अजित पवारांचे जवळचे म्हणून ओळखले जातात. फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन केलेल्या अल्पजीवी सरकारच्या प्रयोगातही मुंडे यांचे योगदान होते असे मानले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस-मुंडे भेटीनं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
