आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा! – उद्धव ठाकरे यांचे ट्विट
मुंबई : राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या नंतर महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!, असं ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून ट्विटरवरून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील आता शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेजी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन, खरचं मनापासून आनंद झाला, नाशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. यापुढे राज ठाकरे यांनी त्यांना सुचक सल्ली देत लिहिले की, आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, पुन्हा एकदा आपले अभिनंदन, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022
