Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीस मारहाण केली नाही -अब्दुल गफूर अहमद पठाण

पुणे : अशोका म्युज शेजारील भैरोबा नाला येथे अनधिकृत पणे सिमेंटचे पाईप टाकून रस्ता करत असल्याने या विरूध्द समाजसेवक असलम इसाक बागवान यांनी आक्षेप घेतला आहे.यासंदर्भात तक्रार द्यायला बागवान हे या तक्रारी बाबत पाठपुरावा करायला बांधकाम विभाग, सावरकर भवन येथे गेले असता गफूर पठाण यांनी शिवीगाळ केली आणि नंतर गंधर्व हॉटेल येथे बोलावून साथीदारां वर मारहाण केली. या बरोबरच पत्रकार रियाज मुल्ला यांनी या प्रकरणाची सत्यता जनतेपर्यंत बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध केली म्हणून नगरसेवक गफूर पठाण व त्यांच्या साथीदार हे या पत्रकारास धमकी देत आहेत.  रियाज मुल्ला यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.असा आरोप असलम बागवान यांनी केला आहे.व मला सुद्धा मारहाण केली. असा आरोप बागवान यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल गफूर अहमद पठाण यांच्यावर केला आहे.
त्यावर आज पत्रकार परिषदेत अब्दुल गफूर अहमद पठाण यांनी असलम बागवान यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत खुलासा केला आहे.
पठाण म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते असलम बागवान हे पाच वर्षे माझ्यावर अनेक वेळा खोटे आरोप करून माझी बदनामी करत आहेत. नुकतीच त्यांनी कोंढवा खुर्द मधील अशोका मुज शेजारील भैरोबा नाल्यामध्ये बिल्डरच्या मदतीसाठी
अनूधिकुत सिमेंटचे पाईप टाकून तसेच याबाबत तक्रार केली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. यामध्ये मलाही आरोपी केले आहे. मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीस मारहाण केली नाही. झालेल्या घटनेबाबत मला कोणतीही माहिती नाही.
अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल गफूर अहमद पठाण
यांनी दिली आहे.
पठाण म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते असलम बागवान त्यांनी माझ्याविरुद्ध महानगरपालिकेत अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये मी वीज चोरी आहे अशी तक्रार केली होती. या तक्रारीबाबत महापालिका आयुक्त यांच्या कार्यालय मध्ये सुनावनी झाली होती. त्यात सुनावणीमध्ये काहीच तथ्य नाही असे झाले होते. गेली पाच वर्षे माध्यमामधून तसेच खोटे आरोप करून माझी बदनामी व अब्रू नुकसान करण्याचा बागवान प्रयत्न करत आहेत. असा आरोपही पठाण यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading