प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळ दूर करा – जगदिश मुळीक
पुणे :२८-आगामी निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींबाबत आणि असेलेल्या घोळांबाबत भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्रुटींबाबत भाजपाच्या हरकती व सूचनांची नोंद घेण्याबाबत चर्चाही केली.
पुणे महापालिकेच्या आगामिक निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने दिनांक २३ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये पुढील प्रमाणे त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. कृपया त्या दुरूस्त करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाला या विरोधात न्यायालयात जावे लागेल.
१. महापालिकेची प्रभाग रचना करताना चुकीची तोडफोड करण्यात आली आहे.
२. प्रारूप प्रभाग रचना करताना एका प्रभागातील मतदार दुसर्या प्रभागात टाकणे, काही याद्या गायब होणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
३. मतदार याद्या ’बीएलओ’ कडून करून घेणे आवश्यक होते, परंतू संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या गेल्याने त्यात चुका झाल्या .
४. शिरूर लोकसभा मतदार संघातील आणि पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील वडू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक २ मध्ये केलेला आहे.
५. प्रभाग क्र. ३६ आणि प्रभाग क्र. १६, प्रभाग क्र. १७ आणि प्रभाग क्र. ५२, प्रभाग क्र. ५२ आणि प्रभाग क्र. ५१ अशा विविध प्रभागांमध्ये ४ ते ५ आणि काही प्रभागांत १० ते १५ मतदार याद्या दुसर्या प्रभागात जोडल्या गेल्या आहेत.
६. महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ५८ प्रभागांपैकी १७ प्रभागांत लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे प्रमाण जवळपास ३०% इतके आहे.
शहरातील सर्व प्रभागांमधे प्रभागांतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत आहेत. याबाबत पुणे शहर भाजपच्या वतीने हरकती आणि सूचना देण्यात येणार आहे.
यावेळी शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या समवेत मा. आमदार योगेश टिळेकर, मा. सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येंनपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, अर्चना पाटील, योगेश मुळीक, प्रमोद कोंढरे, महेश पुंडे, पुनित जोशी, जितेंद्र पोळेकर, सचिन मोरे,सुनिल खांदवे, तुषार पाटील, गायत्री भागवत, संदिप मोझे, संतोष खांदवे यांच्यासह महापालिका पदाधिकारी उपस्थित होते.
