Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

मनोजकुमार गायकवाड यांची संभाजी ब्रिगेडच्या राज्य सहसंघटक तथा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष पदी नियुक्ती.

 

पुणे:संभाजी ब्रिगेड तर्फे इंजि. मनोजकुमार गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य सहसंघटक तथा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष पदी नियुक्ती. करण्यात आली असल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी केली आहे.

इंजि. मनोजकुमार गायकवाड, हे स्वतः उच्चशिक्षित असून ते सातत्य पूर्ण रित्या शैक्षणिक, पदवीधर, औद्योगिक, सामाजिक अडचणी वरती सोडविण्यासाठी कार्यरत असतात. त्यांनी पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन करणे, सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन बचाव, कोव्हीड काळात जनसामान्यांच्या अडचणी, विनाअनुदानित शिक्षक अडचणी सोडविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.

ते मूळचे सोलापूर जिल्ह्य़ातील रहिवासी असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने ते देश विदेशात कार्यरत असून, जागरूक सामाजिक चळवळी मुळे पाश्चिम महाराष्ट्रात उत्तम जनसंपर्क सह आपल्या वेगळ्या कार्यपद्धती बद्दल ओळखले जातात.

सर्व बाबी पाहता संभाजी ब्रिगेड पार्टीची विचारधारा वाढविण्याच्या दृष्टीने व राजकीय बांधणीच्या अनुषंगाने ते प्रदेश कार्यकारिणीच्या धोरणा प्रमाणे नवनियुक्त जबाबदारीस न्याय देऊ शकतील हा विश्वास व्यक्त करुन राज्य कार्यकारिणी त्यांची सदर पदावर नियुक्ती केली आहे.

संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी इंजि मनोजकुमार गायकवाड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading