fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे का तोडली? -मोहन भागवत

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत वेगळी भूमिका मांडताना दिसत आहे. आज त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात अशीच एक वेगळी भूमिका मांडली आहे. मोहन भागवत यांनी स्वपक्षीय आज भाजपचेही कान टोचले आहेत. काही दिवसांपूर्वी भागवत यांनी ज्ञानवापी प्रकरणावरुन ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही’ असं वक्तव्य करुन भाजपलाच धक्का दिला होता. आता अशाच प्रकारे धार्मिक आक्रमणावर त्यांनी भाष्य केलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करतानाही ते दिसले.

मोहन भागवत म्हणाले, भारतात आतापर्यंत झालेल्या आक्रमणं ही धार्मिक आक्रमणे होती. बाहेरुन आलेल्या आक्रमकांनी इथली मंदिरं धर्म भ्रष्ट केला असा आरोप हिंदुत्ववादी संघटना करत आल्या आहेत. मात्र, याच भूमिकेला भागवत यांनी छेद देण्याचा प्रयत्न केला. मोहन भागवत म्हणाले, की अरबस्तान मधून आलेले आक्रमक इस्लाम म्हणून आले नाहीत. मुळात त्यांनी आक्रमण केल्यावर इस्लाम पाळलाच किती हा प्रश्नच आहे. हा विदेशी विरुद्ध स्वदेशी असा लढा होता. याला धार्मिक आक्रमण म्हणणे चूक होईल.

मोहन भागवत म्हणाले , की अरबस्तानाबाहेर इस्लामी आले ते राजकीय महत्वाकांक्षेने, रोममधून ख्रिश्चन आले ते राजकीय हेतूने. यात मंदिर तोडली ती तुमची मानसिक कणखरता तोडण्यासाठी, तुमचा देव तुमचं रक्षण करू शकत नाही तर या इकडे नाहीतर मरा, असं करुन मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयत्न होता. हेच शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं.
त्यामुळे ते असल्या प्रकरणात अडकले नाहीत, असा युक्तीवाद सरसंघचालक भागवत यांनी केला आहे.
त्याचवेळी हिंदुत्वाच्या भावनेने पुढे जाण्यासाठी आता संघाच्या माध्यमातून सर्वत्र प्रेम पसरवायचे आहे, असेही मोहन भागवत म्हणाले. आता देशात कोणत्याही समाजामध्ये भांडणे होऊ नयेत, यावरही भर देण्यात आला आहे. भारताने विश्वगुरू बनून संपूर्ण जगाला शांततेचा धडा शिकवावा. “इस्लाम बाहेरून हल्लेखोरांच्या माध्यमातून आला .
त्याच वेळी या हल्ल्यांमध्ये भारताचे स्वातंत्र्य हवे असलेल्यांचे मनोधैर्य कमी करण्यासाठी मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. पण हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाहीत. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही त्यावेळी हिंदूच होते. त्यांना दीर्घकाळ स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांच्या सहनशीलतेला दडपण्यासाठी हे केले गेले होते, त्यामुळे हिंदूंना वाटते की ही धार्मिक स्थळे पुनर्स्थापित केली पाहिजेत. असे हि मोहन भागवत म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading