Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांना अटक करून करवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन : कुल जमात-ए-तंजीम

पुणे : नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यानीं देशात धार्मिक भावना दुखावणे, दोन समुदायांमध्ये द्वेष भडकावणे, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणणे तसेच समाजात दुरावा निर्माण करणारी विधाने केली.
आरोपी भा.ज.प चे राजकारणी आणि राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीन जिंदाल मीडीया प्रभारी होते , . एका न्युज चैनलवर व नवीन जिंदालह्याने ट्विटर वर इस्लाम आणि त्याच्या तत्त्वांवर अपशब्द बोलले होते, असे वक्ते मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे शब्द बोलून द्वेष भडकवताना स्पष्टपणे दिसत आहेत. मुलाखतीत ते स्पष्टपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या बाबत अत्यंत खालच्या पातळीवर जावून अपमानजनक भाष्य करताना दिसत आहे आणि तिच्या टिप्पण्यांमुळे देशात जातीय तणाव निर्माण झाला आहे. देशभर मुस्लिम समाजात तीव्र संताप व नाराजगी विरोध प्रदर्शनाने दिसून येत आहे .
आरोपीने नॅशनल टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मचा व ट्विटरचा वापर करून भारतातील मुस्लीम समुदायांना लक्ष्य करून अशा वाईट टिप्पण्या बोलल्या. विधाने धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने केली गेली आहेत आणि आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहेत. ज्या काळात धार्मिक हिंसाचार सामान्य होत चालला आहे. धार्मिक हिंसाचार भडकवण्यासाठी अशी विधाने केली गेली असण्याचीही शक्यता आहे.
नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या विरुद्ध पुण्यात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना त्वरीत अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भारत देशावर नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे दोघांवर राष्ट्रद्रोहचा गुन्हा दाखल करावा. ही मागणी कुल जमात-ए-तंजीम करीत आहे .

तरी आम्ही कुल जमात-ए-तंजीम,महाराष्ट्र ऍक्शन कमिटी ,पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ,सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया,ऑल इंडिया ईमाम्स कौन्सिल,जमीयत उलेमा हिंद ,जमाते ईस्लामी , MIM व इतर संघटना राज्य सरकारशी व प्रशासन शी आग्रह करतो कि नुपुर शर्मा व् नविन जिन्दल ह्यना त्वरित अटक करून तुरुंगात टाकावे व देशात शांतता स्थापित करावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading