‘ट्रान्सकुक’ तृतीयपंथीयांसाठी कुकरी-कॉम्पिटिशन चे आयोजन
पूणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पुण्यात ‘ट्रान्सकुक’ तृतीयपंथी यांच्या साठी कुकरी कॉम्पिटिशन आंतराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णु मनोहर यांच्या मार्फत ही स्पर्धा घेण्यात आली. पुणॆ, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा पाच शहरातून ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक शहरातून किमान दोन किंवा अधिक तृतीयपंथी यांची निवड करण्यात येईल आणि अंतिम फेरी नागपूर येथे 14/15 जून 2022 ला होणार आहे. विष्णु जी की रसोई, एरंडवणा पुणे येथे ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम पारितोषिक रोख रक्कमेचा असून सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या प्रसंगी मान्यवर विष्णु मनोहर यांच्या सोबत, अमृता पटवा, सुजाता नागपूरे, यश सातपुते आणि तृतीयपंथी महिला कादंबरी मॅडम उपस्थित होत्या. तृतीयपंथी यांचा आवाज ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी महिला कादंबरी यांची मोलाची साथ लाभली. पुण्यातून प्राथमिक फेरी घेण्यात आली. त्यात सुमारे 20 तृतीयपंथी स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी स्पर्धकांनी घरून आवडीने बनवून आणलेल्या पदार्थचे परीक्षण विष्णु मनोहर तसेच त्यांचा टीम ने केले. सात तृतीयपंथी यांची निवड करण्यात आली आहे. इतर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत हरघर रोजगार च्या शिल्पा देसाई, MIST ऑर्गनायझेशन चे शाम कोन्नुर, सिद्धांत, COL चे फाउंडर योगेश ठीक सर, रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर च्या निशा पाटील यांनी तृतीयपंथी यांचे मनोबल वाढविले आणि त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता LGBTQI+ फ्लॅग आणि समानतेचा संदेश देत, तृतीयपंथी अस्तित्व, मानसिकता,वास्तव्य याचा प्रसार करण्यात आला. आणि प्राईड मंन्थ 2022 चे खऱ्या अर्थाने सेलेब्रेशन करण्यात आले.
त्याच प्रमाणे उद्या मुंबई आणि नंतर इतर शहरातून देखील ट्रान्स कूक तृतीयपंथी कुकरी कॉम्पिटिशन होणार आहे. स्वत विष्णु मनोहर हे पदार्थाची चव घेत स्पर्धक निवड करनार आहेत. त्यामुळे स्पर्धा अगदी तगडी आणि रुचकर होणार अशी अपेक्षा आहे.
