जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार अटकेत, 4 मोबाईल व 9 दुचाकी हस्तगत
पुणे : गांज्याच्या व दारूच्या व्यसनामुळे एका व्यक्तीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांकडून एकूण 4 मोबाईल व 9 दुचाकी असा 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचे व वाहन चोरीचे तब्बल 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत .
बंडगार्डन पोलिसांनी सतर्कता दाखवत पुणे स्टेशन परिसरामध्ये अटक केलेल्या संशयितांकडून वेगवेगळ्या दहा गुन्हांची उकल झाली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस मोहन काळे हरीश मोरे उपस्थित होते.
सागर पाटील म्हणाले, अटक केलेल्या 25 वर्षीय आरोपीचे नाव दिनेश हरकाबहादूर विका असून सध्या तो भोसरी येथे वास्तव्यास आहे. परंतु त्याचा दुसरा साथीदार मात्र पोलिसांना चकवा देत पसार झाला. पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधले दाखल गुन्हे बंडगार्डन पोलीसानी उघडकीस आणले आहेत.
सदर कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, राहुल पवार मोहन काळे प्रताप गायकवाड नितीन जगताप ,सुधीर घुले, अनिल कुसाळकर संजय वनवे, सागर घोरपडे यांनी केली आहे.
