Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रात दृष्टीहीनांना संधी

पुणे : ‘ दृष्टी नसली तरी माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांशी मेन स्ट्रीम टेस्टींग, अॅक्सेसिबिलीटी,प्रोग्रामिंग, संगणक प्रशिक्षण कामांमध्ये दृष्टिहीनांना करीयर संधी आहेत, असे प्रतिपादन माहिती -तंत्रज्ञान तज्ज्ञ श्रीनिवास चक्रवर्थुला यांनी केले.

कोरोना साथीनंतरच्या काळात विविध करीयर संधींचा शोध घेऊन सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, महाराष्ट्र) च्या वतीने नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, इंडिया ‘ च्या सहकार्याने’ आयोजित इन्स्पिरेशन 2022 ‘ या राष्ट्रीय युवती परिषदेचे उद्घाटन दि.४ जून रोजी सकाळी आळंदी येथे झाले. ‘ डेअर टू रिशेप द वर्ल्ड ‘ या संकल्पनेवर ही परिषद झाली.

४ आणि ५ जून रोजी आळंदीत धारिवाल सभागृह ( फ्रूटवाला धर्मशाळा , आळंदी देवाची)येथे ही परिषद पार पडली. विविध राज्यातून दृष्टिहीन युवती उपस्थित होत्या.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच जून रोजी नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली .त्यात डॉ कुसुमलता मलिक यांनी मार्गदर्शन केले. ‘ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधी ‘ विषयावरील कार्यशाळेत श्रीनिवासु चक्रवरथुला यांनी मार्गदर्शन केले.

श्रीनिवासु चक्रवरथुला म्हणाले, ‘ माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची आवड असली पाहिजे, आणि सातत्यपूर्ण कामाची तयारी, चौकटीबाहेर काम करण्याची तयारी असली पाहिजे. दृष्टी असलेल्या व्यक्तींचाही विचार करता आला पाहिजे. कॉल सेंटरमधील कामातही दृष्टीहीन व्यक्तींना वाव आहे. प्रॉडक्ट मॅनेजर म्हणूनही काम करता येते.

कौशल्ये प्रशिक्षणात आपण इतके प्रवीण व्हावे, की दृष्टीहीन आहे, म्हणून कोणालाही रोजगार नाकारता येऊ नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांनी केले.

‘ कार्पोरेट क्षेत्रातील वैविध्य आणि सहभाग ‘ या विषयावरील चर्चासत्रात नीरज कुमार, रजनी विनोद , डॉ.सोनम कापसे, सोभना जय माधवन सहभागी झाले. दत्तात्रय जाधव, एचएल. चाफेकर उपस्थित होते.

‘कायदेशीर हक्क ‘ विषयावरील परिसंवादात डॉ.संजय जैन ,ऍड .जयना कोठारी, अंचल भतेजा, डॉ. जया सागडे सहभागी झाले. डॉ जया सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण परिषदेचा समारोप झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading