Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रपती पुणे दौऱ्यावर येत असल्याने उद्याचा पाणी पुरवठा बंदचा निर्णय रद्द

पुणे : महापालिकेकडून उद्या गुरूवारी शहरातील वडगाव आणि भामा-आसखेड जलकेंद्र वगळता इतर सर्व शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला.
उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली. येत्या शुक्रवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असल्याने हा पाणीबंद रद्द केला असल्याची माहिती अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
महापालिकेकडून शहरातील जलकेंद्राची दर महिन्यातून एकदा देखभाल दुरूस्ती केली जाते. त्यासाठी ही जलकेंद्र पूर्णदिवस बंद ठेवली जातात. त्यानुसार, या गुरूवारी महापालिकेने पर्वती, एसएनडीटी, लष्कर, चतृशृंगी, एसएनडीटी जलकेंद्र तसेच नवीन व जुना होळकर जलकेंद्र बंद ठेवण्यात येणार होते. मात्र, आता ही सर्व केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून त्या दिवशी नियमित पाणी येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading