राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द; चर्चांना उधान
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची २१ मे ला पुण्यातली नदी पात्रात होणारी सभा रद्द झाली आहे. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे. प्रकृती ठिक नसल्याने ही सभा रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर पावसांचा अंदाज असल्याने सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र पाठवण्यात आले आहे.
येत्या आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला होता. त्यानिमित्ताने २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार असून याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले होते. दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असणारे राज ठाकरे हे आज मुंबई साठी रवाना झाले आहेत.
