Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कालच्या पुण्यातील राडा संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणार – जगदीश मुळीक

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर होत्या. बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. परंतु या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला  गालबोट लागलं आहे.
स्मृती इराणी बालगंधर्व सभागृहात आल्यावर त्या ठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या एका महिलेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्यामुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापले बघायला भेटले. त्या वर भाजपचे  शिष्टमंडळ आज डेक्कन पोलिस स्टेशन येथे तक्रार केले यावेळी भाजप पुण्याचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जगदीश मुळीक म्हणाले, कालच्या पुण्यातील राडा संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणार अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली. जगदीश मुळीक म्हणाले भाजपच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी आम्ही केली आहे.
स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता का? यांच्या विरोधात पोलिसांनी कृती केली नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर हल्लां कराण्याचा प्रयत्न केला, तिथे ही पोलिसांनी कुठली ही कारवाई केली नाही, असा आरोप जगदीश मुळीक यांच्याकडून करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading