fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

राज ठाकरेंची पुण्यात ‘या’ दिवशी होणार सभा

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची पुण्यात सभा होणार आहे. 21 तारखेला राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची सभा पुण्यातील भिडे पुलाशेजारी नदीपात्राच्या रस्त्यालगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सभेला नियम आणि अटी या विषयी पोलिस निर्णय घेतील, पुणे पोलिसांकडून सभेस्थळाची पाहणी करण्यात येत आहे. अर्थात अद्याप अधिकृत घोषणा याबाबत झालेली नाही. मात्र पुण्यातील मनसे सभेला परवानगी नाकारण्याचं काहीच कारण नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं याठिकाणीच सभा होणार हे निश्चित झालं आहे.
मनसेनं पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार राज ठाकरे यांची सभा शनिवार 21 मे रोजी होणार आहे. या सभेसाठी मुठा नदी पात्रातील डेक्कन जिमखाना येथील जागा मनसेकडून निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी सभेला आणि स्पीकर वापराला परवानगी द्यावी अशी मागणी मनसेनं पोलिसांकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading