Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे विशेष साहित्य संमेलन २०२२ पुणे ची तयारी अंतिम टप्प्यात

 

  • संमेलनाच्या पूर्वसंध्येला महात्मा फुले ते संमेलन स्थळापर्यंत (सावित्रीबाई फुले स्मारक) ग्रंथदिंडीने होणार संमेलनाची सुरूवात –

पुणे : साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित पुणे येथे होणाऱ्या साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे विशेष साहित्य संमेलन २०२२ ची तयारी अंतिम टप्प्यात झाली असून संमेलन अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संमेलनाच्या लोगोचे अनावरण पत्रकार संघ येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासनचे अध्यक्ष विजय बापु डाकले व स्वागताध्यक्ष अविनाश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष हनुमंत साठे, साहित्य परिषदेचे संस्थापक सचिन बगाडे, निमंत्रक अनिल हातागळे ,बाळासाहेब भांडे ,विनोद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या संमेलन स्थळास राजर्षी छत्रपती शाहू महाराज संमेलन नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच मुख्य विचारपीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तर प्रवेशद्वारास आनंदराव बागवे व प्रवेशद्वार क्र. २ यास ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे नाव देण्यात व आले आहे. ग्रंथ प्रदर्शनास मुक्ता साळवे ग्रंथ दालन असे नाव देण्यात आले आहे. एकुणच संपूर्ण परिसरास महापुरूषांचे व साहित्यिकांच्या नावांमुळे संपूर्ण संमेलन स्थळ हे विशेष आकर्षण ठरणार आहे.

संमेलनच्या पूर्वसंध्येला शनिवार, दि. १४ मे २०२२ रोजी सायं. ६ वा. महात्मा फुले वाडा ते संमेलन स्थळ (सावित्रीबाई फुले स्मारक) ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. य ग्रंथदिंडीमध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे, रमेश बागवे ( मातंग एकता आंदोलन संस्थापक), विजय ब डाकले यासह पुणे शहरातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व सामाजिक व राजकीय क्षेत्राती विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading