पं. आनंद भाटे यांच्या गायनाने भारतरत्न पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाची सांगता
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा’ची सांगता किराणा घराण्याचे गायक आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांच्या गायनाने झाली. पं. भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेला राग शुद्धकेदारने त्यांनी गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी दोन बंदिशी सादर केल्या. ‘सोहे लैनारी’ ‘सावन की बुँदनिया’ पं. भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांनी गायलेले बसंत बहार चित्रपटात गायलेली बसंत बहार या रागातील रचना केतकी गुलाब जुई चंपक बन फुले ही रचना सादर केली. तसेच पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इतर काही रचना सादर केल्या. त्यांना तबला साथ भरत कामत, संवादिनी साथ निरंजन लेले, तानपुरा साथ ईश्वरी श्रीगार यांनी दिली. दोनही दिवस कार्यक्रमाचे निवेदन नेहा परांजपे यांनी केले.
