fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

छोडेंगे नही, तोडेंगे, शिवसेनेची जुन्या मोडमध्ये जाणून दादागिरी; नवनीत राणा प्रकरणी चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

पुणे :  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, लीलावती रुग्णालय खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल, मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण सत्तेत होतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. तसेच ‘छोडेंगे नही, पाव तोडेंगे असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांवरून शिवसेना जुन्या मोडमध्ये गेली आहे. दादागिरी सुरू आहे’, असा आरोप करत शिवसेनेवर हल्लाबोल केला.

चंद्रकांत पाटील त्यांनी पुण्यातील विविध प्रश्नासंदर्भात आज महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, नवनीत राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हनुमान चालिसा वाचायची होती. तेव्हा शिवसेनेने त्यांना त्यावेळी सांगायचे होते. नवनीत राणांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती? ते हनुमान चालिसा म्हणणार होतो, रावणचालिसा नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांचा एमआरआय झाला, त्या कक्षातले फोटो समोर आले. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. तिथे गोंधळ घातला. तर शिवसेनेच्या या भूमिकेवरून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लीलावती रुग्णालय खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल. मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण सत्तेत होतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यावे. असा टोला पाटील यांनी लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading