Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गॅस दरवाढी विरोधात पुणे शहर काँग्रेस पार्टीची गॅस सिलेंडरला उपहासात्मक श्रद्धांजली

पुणे : गॅस दरवाढी विरोधात पुणे शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने गॅस सिलेंडरला उपहासात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच लाकडाच्या मोळीची पूजा देखील करण्यात आली. काल पुन्हा मोदी सरकार ने ५० रुपयाने गॅस ची दरवाढ केली. गॅस १००० पर्यंत गेला आहे, ह्या दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाने आज सकाळी (9 मे) लोहीया नगर, काशीवाडी येथे हे आंदोलन केले. यावेळी उपहासात्मक गॅस सिलेंडरला श्रद्धांजली आणि लाकडाच्या मोळीची पूजा करण्यात आली.

प्रभाग १९ चे नगरसेवक रफिक भाई शेख व महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संगीता तिवारी म्हणाल्या, घराला सरपण देणारी पार्टी ह्या भाजपा आणि मोदी सरकारने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल केले आहे, आम्ही ह्यावेळी सिलेंडर ला हार घालून त्यास भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि लाकडाच्या मोळी ची पूजा केली, आता सरपण च आणावे लागेल ना आम्हाला. गॅस तर परवडणार नाही. क्या से क्या कर दिया बेवफा भाजपा पार्टी ने.ह्या ढोंगी नी मते मागितली विकास.रोजगार,आणि प्रगती च्या नावावर आणि दिले काय गरीब जनते च्या झोळी मध्ये बेरोजगारी आणि प्रचंड महागाई ,विकास तर जनमलाच नाही हो. गरीब जनते ला शिक्षण महाग करून ठेवले आहे आता गरीब पोट कसे भरणार एवढा महाग गॅस घेवून. छोटे छोटे व्यावसायिक आता कोरोना मधून त्यांची कंबर तुटली आहे आणि त्यात सरकार गॅस, पेट्रोल डिझेल रोज महाग करीत आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आज हे आंदोलन केले.

यावेळी साबीर भाई शेख. विपुल उमंगे, विरू भोसरे, बेबी ताई राउत, सुनीता नेमुर्, सुशील साळुंखे आणि इतर महीला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading