Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महापालिका निवडणुकीसाठी पालिकेची प्रभाग रचना कायम राहणार

पुणे: राज्यशासनाने 11 मार्च रोजी कायदा करण्यापूर्वी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना कायम ठेवावी, असेही कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेकडून 2022 च्या निवडणुकीसाठी जाहीर करून हरकती आणि सूचना मागवून अंतिम अहवालासह निवडणूक आयोगाकडे पाठविलेली प्रभाग रचना कायम राहणार आहे.

तसेच तीन सदस्यांच्या प्रभागानुसारच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दोन आठवड्यांत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची मुदत दिल्याने आता इच्छूक, राजकीय पक्ष आणि प्रशासनास निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. तर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 12 जुलै 2022 रोजी ठेवली असून आयोगास आदेशानुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी शहरातील लोकसंख्येच्या निकषांवर 58 प्रभाग आणि 173 उमेदवारांची संख्या असणार आहे. या प्रभाग रचनेवर सुमारे साडेतीन हजार हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यानंतर यावर झालेल्या सुनावणीसाठी काही मोजकेच नागरीक उपस्थित होते. या सुनावणीनंतर सुमारे 28 बदल करत सुनावनी समितीने आपला अंतिम अहवाल निवडणूक आयोगास 10 मार्च रोजी सादर केला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी राज्य शासनाने निवडणूक आयोगाचे अधिकार कमी करत काही आरक्षण, निवडणुका, जाहीर करणे, नव्याने प्रभाग रचना करणे असे अधिकार आपल्याकडे घेत आयोगाने केलेली प्रभाग रचना रद्द केली होती.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात राज्यशासन ओबीसी संदर्भातील आरक्षणाची ट्रिपल टेस्ट पूर्ण करू शकत नसल्याने ओबीसी आरक्षण वगळता एसटी आणि एसटी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या एकूण 173 जागांपैकी सुमारे 148 जागा या खुल्या गटातील उमेदवारांसाठी आरक्षित असणार आहेत. ओबीसी आरक्षण मंजूर झाले असते, तर ओबीसींसाठी 47 जागा आरक्षित असत्या. मात्र, तर आता खुल्या 148 जागांमधील 74 जागा खुल्या गटांमधील महिलांसाठी राखीव असणार असून अनुसूचित जातींसाठी 23 तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव असणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading