fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

प्रतापगडाची यशोगाथा ‘शेर शिवराज’ २२ एप्रिलला चित्रपटगृहात

शिवराज अष्टकातील चौथे चित्रपुष्प शुक्रवारी प्रेक्षकांसमोर

प्रतापगड ! नुसते नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर उभी राहते महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा ! ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे शिवाजी महाराजांच्या युध्दशास्त्राने दिलेलं एक अजोड देणं! तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने प्रचंड विजय मिळविला. हाच दैदिप्यमान इतिहास ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने येत्या शुक्रवारी २२ एप्रिलला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे.

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड चित्रपटांच्या यशानंतर लेखक–दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हे चौथे चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते मुकेश ऋषी दिसणार आहेत. तर इतर व्यक्तिरेखांमध्ये मृणाल कुलकर्णी जिजाऊ आऊसाहेब, अजय पूरकर सुभेदार तानाजी मालुसरे, दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक, वर्षा उसगांवकर बडी बेगम, समीर धर्माधिकारी कान्होजी जेधे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केसरच्या भूमिकेत तर अक्षय वाघमारे पिलाजी गोळे, विक्रम गायकवाड सरनोबत नेताजी पालकर, आस्ताद काळे विश्वास दिघे, वैभव मांगले शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील, सुश्रुत मंकणी येसाजी कंक, दीप्ती केतकर मातोश्री दिपाईआऊ बांदल, माधवी निमकर मातोश्री सोयराबाई राणीसरकार, ईशा केसकर मातोश्री सईबाई राणीसरकार, रिशी सक्सेना फाझल खानची तर निखील लांजेकर नरवीर जीवा महाले, बिपीन सुर्वे सर्जेराव जेधे यांची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटाचे छायांकन रेशमी सरकार तर संकलन विनोद राजे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज यांचे आहे. सानिका गाडगीळ रंगभूषा तर पौर्णिमा ओक यांनी वेशभूषेची जबाबदारी साभांळली आहे. शुभंकर सोनाडकर यांनी व्हीएफएक्स तर निखील लांजेकर आणि हिमांशु आंबेकर एसएफएक्सची धुरा सांभाळली आहे. वैभव गलांडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक तर असोसिएट दिग्दर्शक सुश्रूत मंकणी आहेत. बब्बू खन्ना यांनी अॅक्शनची जबाबदारी साभांळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर यांचे आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading