Pune Airport : उड्डाण करताना विमानाचा टायर फुटला; सुदैवाने अनर्थ टळला

पुणे : लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा उड्डाण करतानाच टायर फुटल्याची  धक्कादायक प्रकार आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास समोर आला. सुदैवाने तात्काळ ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, टायर फुटल्याने लोहगाव विमानतळाची धावपट्टी खराब झाली असून विमानतळ प्रशासनाने पुढील विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागले आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.

याबाबत विमानतळ संचालकांना विचारले असता, त्यांनी या घटनेची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे विमानतळावरच्या ७० ते ८० विमानाच्या उड्डाणांचे शेड्युल बदलले असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. स्पाइसजेटने एक ट्विट करत पुणे लोहगाव विमानताळाची धावपट्टी बंद असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “पुण्यातील धावपट्टी (PNQ) 15:30 तासांपर्यंत बंद असल्याने, सर्व निर्गमन/आगमन आणि त्यांच्या परिणामी उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. प्रवाशांनी त्यांच्या फ्लाइटच्या वेळा वेळोवेळी तपासाव्यात.”

 

Leave a Reply

%d bloggers like this: