Thursday, August 13, 2026
Latest NewsPUNE

पालिकेतील कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन आयोगाचा फरक भेटणार

पुणे : महापालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला असून त्यांना वेतन आयोगाचा फरक देण्यासही प्रशासनाने मान्याता दिली आहे. मात्र, अद्याप वेतन आयोगाचा फरक देण्यात आलेला नाही.

31 मार्च अखेर महापालिकेस मिळणारे उत्पन्न आणि पालिकेकडे सादर झालेल्या खर्चाचा बिलाचा आढावा घेऊन येत्या काही दिवसात शिल्लक राहणाऱ्या निधीतून पालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज सांगितले

फरकाचा पहिला हप्ता देण्यासाठी सुमारे 180 कोटींची आवश्‍यकता असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात ही फरकाची रक्कम मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
महापालिकेचे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असल्याने पालिकेने वर्षभरात केलेल्या विकासकामांच्या बिलांची रक्कमही पालिकेकडून त्या पूर्वी दिली जाते. दरम्यान, आज अखेर पर्यंत पालिकेचे उत्पन्न 5 हजार 200 कोटींच्या वर गेले आहे तर खर्च 4300 कोटींचा झालेला आहे. मात्र, पालिकेची देणी अंतिम झालेली नसल्याने अंदाजपत्रकातील किती रक्कम शिल्लक राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शिल्लक रकमेवर 180 कोटींमधील किती रक्कम द्यायची याचे प्रमाण ठरविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading