सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालतयं, शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल? – चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल

पुणे : शक्ती विधेयकाला अधिक बळकटी देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन २०२० चे विधेयक क्र. ५२ महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विविध अपराधांसाठी विधेयक २०२० मांडले. या विधेयकाला एकमताने मंजुरी ही देण्यात आली. मात्र या शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल? याची शंका आहे, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज ठाकरे सरकारवर शंका व्यक्त केली आहे.

त्या म्हणाल्या, महिलांना अत्याचारा विरोधात न्याय मिळण्यासाठी अनेक तरतुदी असलेले शक्ती विधेयक विधिमंडळाने एकमताने संमत केले आहे. मात्र राज्यसरकार ज्याप्रकारे मंत्र्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत बलात्काऱ्यांना पाठीशी घालतयं त्यावरून या शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल काय माहीत. अशी शंका उस्थितत करीत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: